Chandrashekhar Bawankule – BJP Executive Meeting In Pune | महाराष्ट्रात विधानसभेला 200 च्या वर जागा जिंकू! प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

Chandrashekhar Bawankule

पुणे : Chandrashekhar Bawankule – BJP Executive Meeting In Pune | भाजपची विधानसभेसाठी व्यूहरचना, याचे आराखडे पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (Shiv Chhatrapati Sports Complex Balewadi) येथे आज रविवारी (२१ जुलै) पार पडत असलेल्या प्रदेश कार्यकारणीच्या अधिवेशनात बांधले जात आहेत. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात राष्ट्रीय नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade), भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw), भुपेंद्र यादव (Bhupender Yadav), पीयूष गोयल (Piyush Goyal), आशिष शेलार (Ashish Shelar), पंकजा मुंडे (Pankaja Munde, मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थित आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

अधिवेशनाच्या प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांंवरील तयारीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. ‘येत्या निवडणुकीत विधानभवनावर भगवा फडकवायचा असेल तर सर्वांनी घरोघरी जाऊन काम करावे. आपल्याला दोनशेच्या वर जागा मिळतील. मला घमंड नाही तर आत्मविश्वास आहे. प्रत्येक बूथ वर दहा मते वाढवा, आपला विजय निश्चित आहे’, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Maharashtra Assembly Election 2024)

बावनकुळे म्हणाले, ” उद्याचे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मत म्हणजे मोदींच्या योजना थांबविण्यासाठी असेल. म्हणून १४ कोटी जनतेला माझे आवाहन आहे की, असे करू नका. योजना बंद करू नका. आज घरोघरी जाऊन मोदी सरकारचे (Modi NDA Govt) काम सांगायला हवे. लोकप्रिय योजना पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. मनात निराशा ठेवू नका. सर्वांनी नेटाने काम करावे. आपले नेते दणकट आहेत. कार्यकर्ता हा आपला श्वास आहे. इथून गेल्यावर प्रत्येक बुथवर जाऊन काम करायचे आहे. मतदार नोंदणी सुरू आहे.

आपण पदासाठी काम करत नाही. महायुतीचा (Mahayuti) निर्णय होईल. कोण लढेल ते वरिष्ठ ठरवतील. पण आपल्याला पक्षासाठी काम करायचे आहे. चार महिने पक्षावर, नेतृत्वावर श्रद्धा ठेवा आणि काम करा. या निवडणुकी आपण शिकलोय आणि पुढच्या निवडणुकीत जिंकणार आहोत. फिरसे जितने का हौसला रखते है हम, असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, ” लोकसभेला आपल्याला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पण मतांची आकडेवारी पाहिली तर थोड्या मतांनी आपल्या अनेक जागा गेल्या. आता विधानसभेला प्रत्येक बुधवर दहा मते वाढविली तर आपला विजय निश्चित आहे. विधानसभेत आपल्याला चांगले यश मिळेल. विरोधकांनी खोटेपणा करून लोकसभेत आपल्याला पराभूत केले. पण आता त्या पराभवातून आपण शिकलो आहोत. त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे.

खरंतर मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी रात्ररात्रं काम केलं आहे.
मराठ्यांना आरक्षण दिले तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत.
आज आंदोलन करताना देवेंद्रजी यांना टार्गेट केले जात आहे.

मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा देतोय. देवेंद्रजी यांनी जो कायदा केला, त्याचा मारेकरी शोधा.
महाविकास आघाडीने पंचायत समितीच्या निवडणुका रोखल्या. गरीब कल्याण योजना ठाकरे सरकारने बंद केली.
हे पाप ठाकरे सरकारने केले असा घणाघात बावनकुळेंनी विरोधकांवर केला आहे. (Chandrashekhar Bawankule – BJP Executive Meeting In Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed