Chandrashekhar Bawankule | ‘पोलिसांनी नियमानुसार जी कारवाई असेल ती करावी’, अपघातप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule

पुणे: Chandrashekhar Bawankule | नागपूरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात (Nagpur Hit & Run( भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचे नाव घेतले गेल्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

रविवारी (दि.८ ) मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने (DCP Rahul Madane) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर याविषयी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान आता विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांचा मुलगा असल्याने पोलिसांवर दबाव असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. (Nagpur Pollice)

‘नागपूर येथील अपघाताच्या घटनेतील कार ही माझ्या मुलाच्या नावावर आहे. गाडी चालवणारा, त्यामध्ये बसणारा, यांच्यावर जो काही गुन्हा दाखल होत असेल तो पोलिसांनी करावा. सर्वसामान्यांवर जी कारवाई होते, ती कारवाई माझ्या मुलावरही झाली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अपघाताच्या तपासात पोलिसांवर दबाव आणला नसल्याचा दावा केला.

ते म्हणाले, ” माझ्यासोबत काल दिवसभर गृहमंत्री होते. मी त्यांना एका शब्दाने ही काही बोललो नाही. जे नियम सर्वसामान्यांसाठी आहेत, तेच नियम या अपघाताच्या तपासात लावले पाहिजेत. गाडीत बसणारा दोषी असेल तर त्यावरही कारवाई करा. या चौकशीबाबत मी अधिक काही बोललो तर पोलिसांवर दडपण आल्यासारखे होईल.

या घटनेची नियमानुसार चौकशी करून कारवाई करावी. ही गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ती गाडी चालवणारा, गाडी बसणाऱ्यावर जो गुन्हा दाखल होत असेल, तो करावा. पोलिसांना जी चौकशी करायची असेल ती करावी. कोणालाही सोडू नये”, असे माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed