Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान; म्हणाले – “राज ठाकरेंच्या व्हिजनची महाराष्ट्राला गरज”

Chandrashekhar Bawankule-Raj Thackeray

पुणे: Chandrashekhar Bawankule | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) या दोघांच्या समोर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. (Chandrashekhar Bawankule)

दुसरीकडे आपण निवडणुकीनंतर भाजपसोबत सत्तेत राहू आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे भाजपकडूनही राज ठाकरे यांच्या बाजूने प्रतिक्रिया देण्यात येत असल्याचं चित्र आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची महाराष्ट्राला गरज असल्याचं म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ” मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाची राज्याला गरज आहे. महाराष्ट्राला त्यांच्या व्हिजनची गरज आहे. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने अमित विधानसभेत आला तर फायदा होईल”,असे भाष्य बावनकुळे यांनी केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक



You may have missed