Chandrashekhar Bawankule | अजित पवारांवरील टिकेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वार्निंग; म्हणाले…

Chandrashekhar Bawankule Ajit Pawar

मुंबई : Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar NCP) काही आमदार सोबत घेऊन महायुतीत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून (BJP Leaders) अजित पवारांना सातत्याने लक्ष्य करण्यात आले. जनसन्मान यात्रेच्या (Jan Sanman Yatra) दरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते.

तसेच भाजपच्या अनेक बैठकांमध्ये महायुतीत अजित पवार सहभागी असतील तर प्रचार करणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. तसेच पक्षातील नेत्यांकडूनही अजित पवारांवर टीका करण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शेवटची वॉर्निंग दिल्याचे समोर आले आहे. संघाने अजित पवारांसोबतच्या युतीवर भाष्य केल्यानंतर भाजपातील काही नेते उघडपणे अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत होते. त्यावर बावनकुळेंनी नेते, कार्यकर्त्यांना समज दिली आहे.

बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या कुठल्याही पक्षाबद्दल भाजपा कुठल्याही नेत्यांनी अवाजवी बोलू नये.
केंद्रीय नेतृत्व, राज्य नेतृत्वाने महायुती स्वीकारली आहे. खालीही ती स्वीकारावीच लागेल. मी शेवटची वॉर्निंग दिली आहे.
यापुढे कुणीही महायुतीतील नेत्यांबद्दल बोलायचे नाही.
महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि मोदींसोबत काम करण्यासाठी आहे.
कुणीही भाजपा कार्यकर्ता यापुढे महायुतीच्या नेत्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. (Chandrashekhar Bawankule)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MVA CM Candidate Issue | शरद पवारांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाची मवाळ भूमिका; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा हट्ट सोडला

Jaydeep Apte Arrest | शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक; जयदीप कसा पकडला गेला जाणून घ्या

Hadapsar Pune Crime News | अट्टल वाहनचोराकडून साडेबारा लाखांच्या तब्बल 24 दुचाकी हस्तगत; हडपसर पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

You may have missed