Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले – “उद्धव ठाकरे यांची अवस्था शोले चित्रपटातील असरानीसारखी”
मुंबई: Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) मविआची (Mahavikas Aghadi-MVA) मोठी पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडण्याएवढेही संख्याबळ महाविकास आघाडीला मिळाले नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) विधानसभा निवडणुकीत केवळ २० आमदार निवडून आले आहेत. (Maharashtra Politics)
ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामधून त्यांचा केवळ १ आमदार निवडून आला आहे. तर मुंबईतून १० आमदार निवडून आले आहेत. उर्वरित राज्यभरातून ठाकरे गटाच्या केवळ ९ उमेदवारांचा विजय झाला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला मोठा विजय आणि ठाकरे गटाच्या झालेल्या पिछेहाटीवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांची अवस्था ही शोले चित्रपटामधील असरानीसारखी झाली आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ” उद्धव ठाकरे यांची अवस्था ही शोले चित्रपटातील असरानीसारखी झाली आहे. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले जे २० आमदार आहेत. त्यापैकी दोन सोडून १८ आमदारांना उद्धव ठाकरे जे काही सांगतात ते पटत नाही. त्यामुळे या २० आमदारांपैकी २ आमदार राहतील, बाकीचे पळून जातील”, असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या
Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’
Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन
Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार