Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha | “लोकसभेला याचा अंदाजच घेतला नव्हता मात्र आता विधानसभेला…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान म्हणाले,…

Chandrashekhar Bawankule

मुंबई : Chandrashekhar Bawankule On Vidhan Sabha | यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपाची (BJP) बरीच पिछेहाट झाली. त्यातून सावरत आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं कंबर कसली आहे. जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच (Mahayuti Seat Sharing Formula) सुरु आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केलेली आहे. नेत्यांच्या बैठका, सभा वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.

या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेला कसे सामोरे जाणार याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. ‘विरोधकांकडून लोकल मुद्दे मांडण्यात आले, खरं तर आम्ही लोकसभा निवडणुकीत याचा अंदाजच घेतला नव्हता’, असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत देशाचे मुद्दे बाजूला राहिले आणि निवडणूक लोकल मुद्यांवर लढली गेली. संसदेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी सारखी झाली. ग्रामपंचायतीचे मुद्दे आणि नगरपालिकेचे मुद्दे त्या निवडणुकीत आले होते.

महाविकास आघाडीने भाजपा संविधान बदलणार आहे, अशा प्रकारचा प्रचार केला. मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली. तसेच राहुल गांधींनी सांगितलं की त्यांचे खासदार निवडून आले तर खटाखट खटाखट पैसे देऊ. याचा अर्थ त्यांनी संभ्रम तयार केला. जनतेला खोटे बोलून मतदान घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. आताही राहुल गांधी यांच्या एका विधानावरून असं दिसतं आहे की त्यांची मानसिकता आरक्षण संपवण्याची आहे “, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, “आम्ही जनतेची कामे करतो, तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की आम्हाला मते मिळतील. मात्र, मते मिळाली नाहीत, त्यानंतर आम्हीही त्याच्या खोलात गेलो. लोकसभा निवडणुकीत आम्ही हरलो आहोत, त्यामधून काही शिकलोही आहोत. मात्र, आमची ती चूक दुरुस्त करून आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. देशाची निवडणूक स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसारखी होईल
याचा आम्हाला अंदाज आला नाही. खरं तर आम्ही निवडणुकीचा अंदाजच घेतला नाही.
निवडणूक अशाच मुद्यांवर फिरत राहिली.
त्यामुळे आम्हाला आता अंदाज आला आहे की, निवडणुकीत काय झालं? हे मान्य आहे की काही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत.

विरोधकांकडून लोकल मुद्दे मांडण्यात आले. मात्र, आम्हीही याचाही अंदाज घेऊ शकलो नाही.
१२ जागा आमच्या थोडक्यात गेल्या. परिस्थिती एवढी घासून होईल याचा अंदाज आला नाही”,
असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Parking Charge On Pune Major Roads | शहरातील मुख्य रस्त्यांवर पार्किंग शुल्क घेण्याचा पालिकेकडून राज्यसरकारकडे प्रस्ताव; जाणून घ्या

Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

You may have missed