Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज; म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Chandrashekhar Bawankule

पुणे: Chandrashekhar Bawankule | शहरात अनेक मतदारसंघात एकापेक्षा अधिक उमेदवार उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने भाजपात पक्षांतर्गत वाद सुरु आहे. दरम्यान इच्छुक उमेदवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी यावे, असा निरोप शहर कार्यालयातून देण्यात आला होता. त्यानुसार बावनकुळे यांनी इच्छुक उमेदवारांची भेट घेतली. (BJP News)

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) तुम्ही इच्छुक आहात. त्याबाबत पक्षाने तुमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. हे म्हणणे पक्ष श्रेष्ठींपुढे मांडण्यात येईल; पण पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करावे लागेल. त्यामुळे वेगळा विचार करू नका, अशा शब्दात बावनकुळे यांनी शहरातील इच्छुक उमेदवारांना समज दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी नगरसेवक असताना काय कामे केली. त्यांची माहिती दिली. या वेळी पक्षाने विधानसभेसाठी संधी देऊन आपला विचार करावा, असे इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितले.

त्यावर विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात. याबाबत पक्षाने तुमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. हे म्हणणे पक्ष श्रेष्ठीपुढे मांडण्यात येईल. पण विधानसभेसाठी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करावे लागेल. त्यामुळे वेगळा विचार करू नका, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed