Chandrashekhar Bawankule | नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांना आवाहन

Chandrashekhar Bawankule

पुणे : Chandrashekhar Bawankule | पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता आगामी 2-3 महिन्यात नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा, प्रत्येक बूथवर नवीन मतदार नोंदवा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पुणे येथे केले. प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बावनकुळे बोलत होते. राज्याचे प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav), सह प्रभारी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश (Shiv Prakash), राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade), राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, प्रदेश पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. (BJP Executive Meeting In Pune)

बावनकुळे यांनी सांगितले की,देवेंद्र फडणवीस‌ यांनी मोठ्या परिश्रमाने मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) कायद्याचा मसुदा तयार केला, मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत.

उद्धव ठाकरे सरकारने मोदी‌ सरकारच्या (Modi Govt) 18 योजना बंद पाडल्या.ओबीसी समाजाचे परत गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व देवेंद्र फडणवीस यांनी आणले. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याचे पाप केले, असा घणाघातही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की,महाविकास आघाडी सरकार राज्यात आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील.राज्यात महायुतीचे‌ सरकार आले‌ तर विकासाचे डबल इंजिन धावणार आहे, हे आपण जनतेला सांगावे. (Chandrashekhar Bawankule)

जिद्दीने संघर्ष करण्याचा आपला पिंड आहे,
त्यामुळे आपण बूथ यंत्रणा मजबूत करून प्रत्येकाने नवे दहा मतदार मिळवण्यासाठी काम करायचे आहे.
तसे झाले तर विधानसभा निवडणुकीत महायुती दोनशे पार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी
यांचे अभिनंदन करणारा ठराव ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी मांडला.
विविध लोककल्याणकारी योजना सादर केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे अभिनंदन
करणारा ठराव मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी मांडला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?