Chas Kaman Dam in Khed Pune | पुणे : चास-कमान धरणात बुडून अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
पुणे : Chas Kaman Dam in Khed Pune | खेड तालुक्यातील चासकमान धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या अग्निशमन दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली असताना चास-कमान धरण परिसरात पर्यटक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रताप सयाजी फणसे (वय-41 रा. नागपूर चाळ, येरवडा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रताप फणसे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामन दलात कार्यरत होते. त्यांना धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
चास-कमान धरण परिसरात पावसाचा जोर नसला तरी भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सुट्टीचा वार असल्याने त्यात रिमझिम पाऊस असल्यामुळे चास-कमान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होती. पुण्यातून सात ते आठ जणांचा ग्रुप धरणावर आला होता. त्यामध्ये प्रताप फसणे हे देखील होते. (Chas Kaman Dam in Khed Pune)
धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या फणसे यांना पाण्याचा अंदाज आला नाही.
ते बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याबरोबर असलेल्या दोघांनी पाण्यात उडी घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पाण्यात खोल गेल्याने फणसे यांचा बुडून मृत्यू झाला. मच्छीमार, बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक कालेकर,
विजय दोरे, अजय खंडे, सूरज दोरे, चंद्रकांत दोरे आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने फणसे
यांचा शोध घेऊन त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या