Chaturshringi Police News | चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरबंद, 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत (Video)

Chaturshringi Police

पुणे : Chaturshringi Police News | चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना चतु:शृंगी पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले आहे (Chain Snatcher Arrested). बालेवाडी (Balewadi) परिसरातून चोरटयांनी (दि.११) महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून चोरून नेले होते. त्याबाबत चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. भा न्या सं कलम ३०९(४),३(५) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://www.instagram.com/reel/C_7ip00plx8/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सदरचा गुन्हा हा संजय बाबरे व राहुल मावस यांनी केला असून ते बालेवाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या बाबत माहिती मिळवली.

दरम्यान, पोलिसांनी बालेवाडी येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. संजय रमेश बाबरे Sanjay Ramesh Babre (वय २९ वर्ष, रा. मु पो लोणी बुद्रुक, हसनापुर रोड, विखे वस्ती, ता. राहता, जि.अहमदनगर) व राहुल रमेश मावस Rahul Ramesh Mawas (वय २४ वर्ष, रा. मु. नादी, पो. वीरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Bolkotgi) यांच्या सूचनेनुसार तपास करत दोघांना अटक करण्यात आली.

यामध्ये आरोपींकडून त्यांनी जबरी चोरी केलेले १ लाख रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्हा करताना वापरलेली १ लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण २ लाख रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल ही देखील चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने येवला तालुका पोलीस स्टेशन (Yeola Taluka Police Station), नाशिक ग्रामीण (Nashik Rural Police), भा द वि कलम ३७९ हा वाहन चोरीचा गुन्हा देखील उघड करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर) IPS Amitesh Kumar,
रंजन कुमार शर्मा (सह पोलीस आयुक्त, पुणे शहर) IPS Ranjan Kumar Sharma , मनोज पाटील
(अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग) IPS Manoj Patil, हिम्मत जाधव (पोलीस उपायुक्त परिमंडळ ४, पुणे शहर) DCP Himmat Jadhav,
अनुजा देशमाने (सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग) ACP Anuja Deshmane
यांच्या मार्गदर्शनाखाली महेश बोळकोटगी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुशृंगी पोलीस स्टेशन),
युवराज नांद्रे (पोलीस निरीक्षक, गुन्हे) PI Yuvraj Nandre, विजयानंद पाटील (PI Vijayanand Patil),
स. पो. नि. नरेंद्र पाटील (API Narendra Patil) व तपास पथकातील अंमलदार पो हवा दुशिंग,
पो हवा दुर्गे, पो शि भांगले, पो शि खरात, पो शि तरंगे यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली

You may have missed