Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | ‘तुझ्या मुलाला मारून टाक…’, शेजारच्या बाईने सल्ला दिला अन् आईनं गुंडाला 20 हजाराची सुपारी देऊन मुलाला संपवलं

Murder

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | आईनेच आपल्या पोटच्या मुलाच्या हत्येची सुपारी देऊन त्याला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १६ मार्च रोजी संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यात एका ३५वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण होते आणि वैद्यकीय अहवालातही हे घातपात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला. (Murder Case)

तपासादरम्यान, धक्कादायक माहिती उघडकीसआली. मुलाला दारूचे व्यसन होते आणि त्याची पत्नी त्याच्या व्यसनामुळे माहेरी निघून गेली होती. तो रोज दारू पिऊन आईकडे पैशांसाठी तगादा लावत होता. त्याच्या सततच्या त्रासामुळे आई पूर्णपणे हतबल झाली होती. एके दिवशी आईने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेकडे आपली व्यथा सांगितली. त्या महिलेने तिला ‘अशा मुलाला कायमचा संपव’ असा सल्ला दिला. हताश झालेल्या आईने त्याच सल्ल्याचे पालन करण्याचे ठरवले. (Mother Kill Son)

आईने किरण गायकवाड नावाच्या एका गुंडाला मुलाला मारण्यासाठी २० हजार रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी १८ हजार रुपये आगाऊ देण्यात आले आणि उर्वरित २ हजार रुपये काम झाल्यावर देण्याचे ठरले. किरणने आपल्यासोबत विजय जाधव नावाच्या आणखी एका व्यक्तीला सहभागी करून घेतले. दरम्यान प्लॅननुसार दोघांनी त्या तरुणाला दारू पिण्याच्या बहाण्याने संत ज्ञानेश्वर उद्यानात नेले. तिथे त्यांनी दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. त्याची ओळख पटू नये म्हणून त्यांनी त्याच्या तोंडाला चिखल लावला आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. दरम्यान पैठण पोलिसांनी आई, किरण गायकवाड आणि विजय जाधव यांना अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed