Chhatrapati Sambhaji Nagar Crime | तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये भाजप आमदाराचे नाव; धमकी दिल्याचा आरोप

Chhatrapati Sambhaji Nagar Crime

छ. संभाजीनगर: Chhatrapati Sambhaji Nagar Crime | छत्रपती संभाजीनगरात तरुणाने आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना घडली आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे आमदार नारायण कुचे (BJP MLA Narayan Kuche) यांच्या नावाचा उल्लेख आहे. कुचे यांच्या धमक्यांमुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हंटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव जयदत्त सुरभेये असे आहे. या तरुणाने आमदार नारायण कुचे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये भाजपा आमदार नारायण कुचेंच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याच उल्लेख करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जयदत्त या तरुणाने कुचे यांच्या जय भवानी बँकेकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुसाईड नोटमध्ये नारायण कुचे यांचे नाव असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

या आरोपांवर नारायण कुचे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आत्महत्या केलेल्या तरुणाला मी आयुष्यात कधीही बोललेलो नाही. तसेच मी त्याला प्रत्यक्षात कधीही भेटलेलो नाही. आमचा फोन द्वारेही संपर्क झालेला नाही. मृत तरुणाचा आणि माझा व्यवहाराचा कधीही संबंध आलेला नाही.

मृत तरुण माझा नातेवाईकच आहे. मृत तरुणाची बहीण माझी सून आहे. मृत तरुणाचा मेहुणा माझ्या पतसंस्थेत नोकरीला आहे. त्यांचं नाव मोतीलाल कुचे आहे. त्यामुळे मृत व्यक्ती माझा जवळचा नातेवाईक आहे, असे नारायण कुचे यांनी स्पष्ट केले आहे.

ते पुढे म्हणाले, मी फोनद्वारे धमकी दिली, असा आरोप केला जात आहे.
मी धमकी देणारा माणूस नाही. मृत तरुणावर लाख ते दीड लाख रुपयांचे कर्ज आहे.
या कर्जाचे हफ्ते क्लियर आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळेच मी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना भेटलो आहे. ही चिठ्ठी मृत तरुणानेच लिहिलेली आहे का?
याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी नारायण कुचे यांनी केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

Pune ACB Trap Case | अबब! दीड लाखांसाठी 50 हजारांची मागितली लाच; PMRDA चे अभियंता,
इंजिनिअरसह तिघांना अटक

Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील ‘त्या’ रिव्हर्स थरारमधील कारण आले पुढे;
पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल

You may have missed