Chhatrapati Sambhajinagar Crime News | हॉटेल मालक समजून जेवायला गेलेल्या अभियंत्याच्या छातीत टोळक्याने चाकू खुपसून केला खून
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime News | हॉटेल स्टाफ अन् ग्राहकांच्या वादात अभियंत्याचा नाहक बळी गेल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये (Yashwant Hotel) बिलावरून टोळक्याचा वाद सुरु असताना त्याचवेळी जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंत्याला हॉटेल मालक समजून टोळक्याने त्याच्या छातीत चाकू खुपसला. घाव हृदयाच्या जवळ खोल लागल्याने अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.६) पहाटे तीन-साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
संतोष राजू पेड्डी Santosh Raju Peddi (२८, रा. राजज्योत बिल्डिंग, उस्मानपुरा) असे मयत अभियंत्याचे नाव आहे. तर खून (Murder Case) करणाऱ्या तीन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे (Chikalthana Police Station) निरीक्षक रविकिरण दरवडे (PI Ravikiran Darwade) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पेड्डी हा आयटी अभियंता (IT Engineer) आहे. त्याचे बी टेक झालेले असून तो एका आयटी कंपनीत वर्क फ्रॉम होम (Work From Home) काम करत होता. त्याच्या कुटुंबीयांचा रोपळेकर चौक भागात पारंपरिक डेअरीचा व्यवसाय आहे. कुटुंबातील सदस्य लग्नासाठी हैदराबादला गेलेले असल्याने संतोष एकटाच घरी होता.
गुरुवारी मध्यरात्री त्याचे काम शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास संपले.
तेव्हा संतोषला भूक लागल्याने त्याने तेथेच राहणारा कारचालक राधेश्याम अशोक गडदे (२०, मूळ रा. मंठा) याला बोलावले.
दोघेही कारने जेवण करण्यासाठी बीड बायपास मार्गे झाल्टा फाट्याच्या दिशेने निघाले.
त्यांना यशवंत हॉटेल असल्याचे दिसले. दरम्यान आतमध्ये प्रवेश करताच टोळक्याने संतोषच्या छातीत चाकू खुपसला.
त्यानंतर उपचारादरम्यान संतोषचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा