Chhatrapati Sambhajinagar Crime News | निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा बनला बाईक चोर, गॅरेज चालकाला विकलेल्या 14 दुचाकी जप्त

Arrest

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime News | शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सय्यद शोएब उर्फ गुड्डू सादिक अली (रा- जहांगीर कॉलनी, हर्सूल) याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी प्रोझोन मॉल समोर रंगेहाथ अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्याने मेव्हण्याच्या मदतीने कन्नडच्या गॅरेज चालकाला विकलेल्या १४ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून प्रोझोन मॉल समोरील रस्त्यावरून सातत्याने दुचाकी चोरी होत आहेत. पार्किंगला दर असल्याने नागरिक फुटपाथवरच दुचाकी उभी करतात. परिणामी, रोज येथे दुचाकी चोरांचा वावर असतो. पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी ही बाब लक्षात घेत पथकाला या परिसरात साध्या वेशात सातत्याने गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सहाय्यक निरीक्षक भरत पाचोळे, अंमलदार संजय नंद, संतोष गायकवाड सामान्यांप्रमाणे फुटपाथवर उभे होते. तेव्हा दुपारच्या सत्रात फुटपाथवर एक तरुण तीन-चार दुचाकींना चावी लावून पाहात होता. तिघांनी तात्काळ त्याला घेरून ताब्यात घेताच त्याची बोबडी वळाली. चौकशीत शोएबची ओळख स्पष्ट झाली. अधिक चौकशीत तो त्याचा सख्खा मेहुणा शहेबाज शेख, हमीद शेख याच्या मदतीने गॅरेज चालक शेख वाजीद, शेख रफिक ( दोघे राहणार- रशिदपुरा) यांना चोरलेल्या दुचाकीची कबुली दिली. अंमलदार हैदर शेख, संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे, परशुराम सोनुने, अरविंद पुरी, विनोद कानपुरे यांनी तत्काळ सखोल तपास करत त्या दोघांना अटक करत १४ दुचाकी जप्त केल्या.

शोएब चे वडील पोलीस दलातून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
तर त्याचा मेव्हणा शहेबाज हा पोलीस भरतीची तयारी करत आहे.
२०१६ मध्ये शोएब शेवटचा तत्कालीन गुन्हे शाखेकडून अटक झाला होता. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी तो पुन्हा पोलिसांच्या हाती लागला आहे.

वाजीद चे कन्नड ला गॅरेज आहे. लॉक खराब झालेल्या दुचाकी हेरून शोएब चोरी करायचा.
त्यानंतर त्याचा मेव्हणा वाजिदला नेऊन विकायचा. पोलिसांनी सर्व दुचाकी कन्नड तालुक्यातून जप्त केल्या.
विशेष म्हणजे आठवड्याभरात एमआयडीसी सिडको पोलिसांनी २ वेगळ्या कारवायात ४ चोरांकडून चोरलेल्या ३९ दुचाकी जप्त केल्या आहेत. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Weather News | येत्या दोन दिवसात राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Pune RTO | खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमीट असेल तर परत करा, आरटीओ कडून होणार कारवाई

Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात