Chhatrapati Sambhajinagar Crime News | निर्दयीपणाचा कळस ! चारही मुलेच, 5000 रूपयांमध्ये मुलगी विकत घेतली अन् निर्घृण हत्या; हात-पाय मोडले, जळत्या लाकडाने अंगावर चटके

Chhatrapati Sambhajinagar Crime

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime News | चारही मुलेच असल्यामुळे ५ हजार रूपयांमध्ये मुलगी विकत घेतली. पण निर्दयी आई-बाबाने तिचीच निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हात-पाय मोडले अन् तिच्या अंगावर चटके दिले. ही घटना सिल्लोडमध्ये घडली आहे. पोलिसांनी निर्दयी पती-पत्नीला अटक केली आहे. आयात फईम शेख असे मयत चिमुकलीचे नाव आहे, तर फौजिया शेख फईम (वय-२७) आणि शेख फईम शेख आयुब (वय-३५) आरोपींची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार, अजिंठा येथील शेख फईम शेख आयुब व फौजिया शेख फईम या दाम्पत्यास ४ मुले आहेत. मुलगी नसल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी चार वर्षीय आयातला जालना येथून शेख नसीम अब्दुल कायुम यांच्याकडून ५ हजार रुपयांमध्ये बॉण्ड पेपरवर व्यवहार करून विकत घेतले होते.

मजुरी करणारे हे कुटुंब १५ दिवसांपूर्वी सिल्लोड येथील मुगलपुरा भागात राहायला आले होते. फौजिया हिला आयातला दत्तक घेणे आवडले नसल्याने तिचा पतीसोबत नेहमी वाद होत होता. सिल्लोड येथे आल्यापासून या दाम्पत्याने तिचा अमानुष छळ सुरू केला. तिला उपाशी ठेवले. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडले. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत मारहाण करून तिला गंभीर जखमी केले.

वेदनेत असलेल्या चिमुकलीची अखेर बुधवारी मध्यरात्री ३ वाजता श्वास सोडला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मध्यरात्रीच तिचा सि येथील एका कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्याचा प्रयत्न केला मात्र आजूबाजूच्या लोकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी दफनविधी रोखला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed