Chhatrapati Sambhajiraje Slams Dhananjay Munde | ‘नुकसानीची पाहणी करायचं सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न’, छत्रपती संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

नांदेड: Chhatrapati Sambhajiraje Slams Dhananjay Munde | राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान झाले आहे. यामुळे मराठवाड्यासह) विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली अनेक पिकं डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याने बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
एकीकडे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावरून स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणे सोडून कृषिमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असल्याची टीका त्यांनी केली
संभाजीराजे यांनी आज नांदेडमधील हदगाव तालुक्यातील उंचाडा, मारलेगाव आणि धानोरा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, हा विषय इतका नाजूक बनला आहे की, अशा वेळेस कृषिमंत्र्यांनी इथे येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला हवेत. नुकसानीचे पंचनामे व्हायलाच पाहिजे.
शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला वेदना झाल्या. कृषिमंत्री इकडे यायचे सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे बरोबर आहे का? हे महाराष्ट्राला शोभते का? कृषिमंत्र्यांना हे शोभते का? जरा इकडे येऊन बघा परिस्थिती काय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा