Chhatrapati ShambhuRaje Rajyabhishek Trust | प्रसिध्दीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांची अस्मिता जपावी; छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टची मागणी
पुणे : Chhatrapati Shambhu Raje Rajyabhishek Trust | महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोकार्पण केलेला मालवणमधील पुतळा केवळ आठ महिन्यांच्या आतच क्षतिग्रस्त झाला (Malvan Shivaji Maharaj Statue). ही घटना निंदनीय असून यामुळे देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. केवळ महाराजांचे नाव घेऊन प्रसिध्दी मिळविण्यापेक्षा आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवणार्या शिवाजी महाराज यांची अस्मिता जपली जावी. तसेच दुर्घटनेबाबत जबाबदार असणार्या संबंधितांना कडक शासन व्हावे, अशी मागणी छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट महाराष्ट्र यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
मालवणमधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर ट्रस्टने पत्रकार परिषद घेत ही मागणी केली. याप्रसंगी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar MLA), शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टचे अध्यक्ष अमरदादा जाधवराव (Amardada Jadhavrao), शिल्पकार विजय लोहगावकर, अजिंक्य लोहगावकर, विघ्नहर्ता चॅरिटेबल ट्रस्टचे अभिजित वाघ यांच्यासह मराठी देशा फाऊंडेशन, विघ्नहर्ताचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमरदादा जाधवराव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभ केलं. जगभरातील इतिहास संशोधक, तज्ज्ञांनी महाराजांचा इतिहास लिहीला. जगभरात महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण केले जाते. केवळ उद्घाटनाच्या घाईमुळे मालवण येथे दुदैवी घटना घडली. या दुर्घटनेस जबाबदार असणार्यांवर कडक कारवाई व्हावी. छत्रपतींच्या मूर्तीच्या उभारणीसाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत. महाराजांच्या वारशाचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे.
शिल्पकार लोहगावकर म्हणाले, मालवण येथील महाराजांची मुर्ती उभारताना स्ट्रक्ट्चरल इंजिनिअरिंगचा अभाव होता. मुर्तीच्या वरचा भाग वजनदार असला तरी सपोर्ट देण्याकडे दुर्लक्ष केले गेले. मूर्ती तयार करताना शिवाजी महाराज यांच्या चेहरा, शरीर, चेहर्यावरचे स्मित हास्य, जिरेटोप, आसनव्यवस्था आर्दीचा ऐतिहासिक दस्तावेजांतून सखोल अभ्यास करूनच मूर्ती तयार केली जावी.
महाराजांच्या स्मारक, मुर्ती, प्रतिमा वापराबाबत आचारसंहिता करावी – आमदार रविंद्र धंगेकर
महाराज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहेत.
साधने नसताना जगभरातील संशोधकांनी महाराजांचा इतिहास लिहिला.
आता आत्याधुनिक टेव्नâॉलॉजी असतानादेखील महाराजांचे स्मारक, मुर्ती बनवताना चुका होत आहेत.
मालवण आणि पुणे महापालिकेतील महाराजांच्या स्मारकाच्या मेघडंबरीचा काही भाग पडला
या दोन्ही स्मारकांचे उद्घाटन देशाच्या पंतप्रधनांच्या हस्ते झाले. या घटनांमुळे सर्वांचे मन हेलावले आहे.
यापुढे स्ट्रक्ट्चरल ऑडिट नंतरच कोणत्याही स्मारकाचे उद्घाटन व्हावे.
तसेच, महाराजांनी मावळ्यांनी बरोबर घेत स्वराज्य उभे केले, मात्र अनेक हॉटेलबाहेर मावळ्यांच्या वेशात माणसे उभी केली जातात.
महाराजांचे फोटो, स्मारक, मुर्ती, प्रतिमा वापराबाबत शासनाने आचारसंहिता केली पाहिजे, अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा