Chhota Rajan Gets Bail | गँगस्टर छोटा राजनला हायकोर्टाकडून दिलासा; जया शेट्टी हत्येप्रकरणी जामीन मंजूर करत जन्मठेपेची शिक्षा रद्द

मुंबई : Chhota Rajan Gets Bail | जया शेट्टी हत्या प्रकरणी (Jaya Shetty Murder Case) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गँगस्टर छोटा राजनला दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आहे. त्यामुळे छोटा राजनला दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती अशी की, अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे म्हणजेच छोटा राजन याला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. छोटा राजनने शिक्षेला दिलेले आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
२००१ मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचे मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने ३० मे रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेला राजनने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याच प्रकरणात त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना १ लाख रुपयांच्या अटीसह जामीन मंजूर केला आहे.
क्राईम रिपोर्टर जेडेंच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला राजन सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. (Chhota Rajan Gets Bail)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)
Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या