Chikhali Pune Crime News | यात्रेत मंगळसुत्र हिसकाविण्यासाठी हात घालणार्याचा हातच महिलेने पकडला

पिंपरी : Chikhali Pune Crime News | महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून (Chain Snatching) नेण्यासाठी त्याने हात घातला. पण, प्रसंगावधान राहून महिलेने चोरट्याचा तो हातच पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. (Chain Snater Arrested)
भिमा शामराव जाधव (वय २५, रा. भिमशक्तीनगर, चिखली) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना चिखलीतील साने चौक (Sane Chowk Chikhali) येथील कृष्णबाजार भाजी मंडईमध्ये १८ सप्टेबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
याबाबत एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी या भाजी मंडई येथे भरविण्यात आलेल्या यात्रेमध्ये फिरून पाहणी करीत होत्या. या वेळी चोरटा भिमा जाधव हा त्यांच्या पाठीमागून आला. त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने चोरुन घेऊन जाण्यासाठी हिसका मारला. त्याचेवळी फिर्यादी यांनी त्याच हात पकडला. भिमाचा हात पकडून त्यांनी चोर चोर असा आरडा ओरडा केला. ते पाहून लोकांनी भिमा जाधव याला पकडून ठेवून पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक पंचमुख तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!