Chikhali Pune Crime News | मोबाईल का घेत नाही, म्हणत जावयाने पत्नीच्या डोक्यात फोन मारुन केले जखमी; मोबाईल तोंडावर मारुन सासर्याचा पाडला दात

पिंपरी : Chikhali Pune Crime News | माहेरी आलेल्या पत्नीने मोबाईल उचलला नाही, म्हणून चिडलेल्या जावयाने सासरे येऊन पत्नीच्या डोक्यात मोबाईल फोन मारून जखमी केले. सासूला मारहाण केली तर, सासर्यांच्या तोंडावर मोबाईल मारल्याने त्यांचा दात पडला.
याबाबत रवींद्र विठ्ठल सोनवणे (वय ५५, रा. समर्थ हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा जावई अमोल अरुण गायकवाड (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोनवणे यांच्या घरात २० सप्टेबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नी मंगल सोनवणे व मुलगी पुजा गायकवाड यांच्यासह घरी होते. त्यावेळी फिर्यादी यांचा जावई घरी आला. त्याने पुजा गायकवाड हिला माझा फोन का घेतला नाही, या कारणावरुन वाद घातला. जावयाने पुजा हिच्या डोक्यात मोबाईल फोन मारुन तिला जखमी केले. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मंगल सोनवणे या मध्ये पडल्या असता जावयाने त्यांनाही मारहाण केली. फिर्यादी हे त्यांची भांडणे सोडवत असताना जावयाने फिर्यादीच्या कानावर, तोंडावर त्यांचा मोबाईल फोन हातात घेऊन मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या कानास जखमी होऊन तोंडातील एक दात पडला. पोलीस उपनिरीक्षक एस एस देवकर (PSI S.S. Devkar) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग