Chinchwad Assembly Constituency | अजित पवारांचा आणखी एक नेता पक्षाला रामराम करण्याच्या भूमिकेत; माझ्यावर अन्याय झाला म्हणत विधानसभेसाठी ठोकला शड्डू, बंडखोरीचा इशारा

Bhausaheb Bhoir

चिंचवड : Chinchwad Assembly Constituency | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar NCP) काही आमदारांना घेऊन महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. तेथे त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

https://www.instagram.com/p/DAf3hZXCY4k

त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा फटका बसला. त्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. पिंक पॉलिटिक्सचा (Pink Politics) वापर करत पक्ष जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

https://www.instagram.com/p/DAf1JaEiv20

दरम्यान अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडला मागील दोन महिन्यांपासून शहराध्यक्ष मिळालेला नाही. त्यातच आता शहरातील आणखी एक नेता पक्षाला रामराम करण्याच्या भूमिकेत आहे.

https://www.instagram.com/p/DAfz2MpJ5ft

अजित पवार गटातील माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांनी चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.

https://www.instagram.com/p/DAfwSrjCsdZ

भोईर निवडणूक कुठल्या पक्षातून लढणार हे येत्या २ ऑक्टोबर रोजी निर्धार मेळावा घेऊन स्पष्ट करणार आहेत. घराणेशाही आणि झुंडशाहीला मी झुकणार नाही. माझ्यावर अन्याय झाला असून माझ्यासाठी सर्व पक्षांचे दरवाजे उघडे आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

https://www.instagram.com/p/DAftoa6ijMf

जून महिन्यापासून मी विधानसभेची तयारी करत आहे. आत्तापर्यंत एक लाख लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे.
मी माझ्या भूमिकेवर ठाम असून आगामी चिंचवड विधानसभा लढणार असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले आहे. (Chinchwad Assembly Constituency)

https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)