Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग; जगताप कुटुंबियांना माजी नगरसेवकांकडून आव्हान

Shankar-Jagtap-Ashwini-Jagtap

पिंपरी: Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबियांचे (Jagtap Family Chinchwad) नेहमीच वर्चस्व राहिले आहे. जगताप कुटुंबातील विद्यमान आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) या दीर-भावजय यांच्यातील गृहकलहानंतर आता नाराज माजी नगरसेवकांकडून जगताप घराण्याला उघडपणे आव्हान दिले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAIVYxOtGGa

दरम्यान माजी नगरसेवकांचा मोठा गट लवकरच पक्षाला राम राम ठोकणार असल्याची चर्चा आहे. चिंचवड भाजपमध्ये मोठी धुसफूस असून, निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/DAIQXmmp1uS

याअगोदर या मतदारसंघातील माया बारणे (Maya Barne), चंदा लाेखंडे (Chanda Lokhande), तुषार कामठे (Tushar Kamthe), संदीप कस्पटे (Sandeep Kaspate) या चार, तर भाेसरीतील एकनाथ पवार (Eknath Pawar), रवी लांडगे (Ravi Landge), वसंत बाेऱ्हाटे (Vasant Borate), संजय नेवाळे (Sanjay Newale) आणि प्रियंका बारसे (Priyanka Barse) या पाच अशा नऊ माजी नगरसेवकांनी गेल्या दोन वर्षांत भाजपला राजीनामा दिला आहे.

https://www.instagram.com/p/DAIL0r6JOAf

लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरून त्यांची पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर जगताप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. सहानुभूती असतानाही त्यांना विजयासाठी झगडावे लागले.

https://www.instagram.com/p/DAGmGj2CHED

राष्ट्रवादीच्या नाना काटे (Nana Kate) यांनी ९९ हजार, तर अपक्ष राहुल कलाटे यांनी ४० हजार मते घेतली. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) बंडखोरीमुळे अश्विनी यांचा विजय सुकर झाला. परंतु, जगताप यांच्या विरोधात दीड लाख मतदार असल्याचे लक्षात येताच मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेतील महत्त्वाच्या पदापासून वंचित राहिलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांनी थेटपणे विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली.

https://www.instagram.com/p/DAGod-kimk7

विरोध करूनही शंकर जगताप यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने नाराज माजी नगरसेवकांचा गट त्यांपासून दूर राहिला. आमदार अश्विनी जगताप यांना साथ देत या गटाने दीड वर्षे काम केले. परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप कुटुंबातील दीर-भावजयीमध्ये समेट झाल्याचे आणि शंकर जगताप यांची भाजपची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/DAGjqA9iuvk

त्यामुळे हा नाराज गट अस्वस्थ झाला. त्यातून शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षनेतृत्वाकडे तक्रार करत टप्प्याटप्प्याने राजीनामा देण्याचे नियोजन केल्याचे बोलले जाते. त्यानुसार पिंपळे निलख परिसराचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्रात पक्षात लोकशाही नसून, केवळ घराणेशाही असल्याचा आरोप करत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

https://www.instagram.com/p/DAGcj3DCHPH

हीच भूमिका घेत वाकड भागातील भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर (Ram Wakadkar) यांनीही पक्ष सोडला. या नाराजांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे (Sharad Pawar NCP) ओढा असल्याची चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/DAGXG1Ci_A7

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | सराईत वाहनचोराकडून ६ मोटारसायकली हस्तगत ! भोसरी, चाकण, चिंचवड, शिर्डी, सोलापूर येथे केल्या होत्या चोर्‍या (Video)

Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!

MCOCA Action On Enjoy Group | जुन्या खुनाचा वचपा काढण्याच्या तयारीत असलेल्या एन्जॉय ग्रुपवर मोक्का कारवाई (Video)

You may have missed