Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का! विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप तुतारी हाती घेण्याच्या तयारीत?; राजकीय वातावरण तापलं

MLA Ashwini Jagtap

चिंचवड : Chinchwad Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना असणार आहे. दोन्हीकडे तीन-तीन पक्ष असल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/DAFtNpktgZj

पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा (Ajit Pawar NCP) बालेकिल्ला समजला जातो मात्र लोकसभा निवडणुकीनंतर या अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला शरद पवारांनी (Sharad Pawar NCP) सुरुंग लावला आहे, याठिकाणचे अनेक नेते, पदाधिकारी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Laxman Jagtap) या विद्यमान आमदार आहेत.

https://www.instagram.com/p/DAFrixupHw4

लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे चांगलेच ऍक्टिव्ह झालेले असून विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वच मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात पिंपरी चिंचवडमध्ये महत्त्वाच्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात डाव टाकण्याचा विचारात शरद पवार असल्याचे बोलले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAEJ6eoJpZw

कारण विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी (Tutari) हाती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) हे देखील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच घरातून दोघांना तिकीट मिळणे अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

https://www.instagram.com/p/DAEDJQsiZjU

मतदारसंघामध्ये अश्विनी जगताप तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यामुळे भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
अश्विनी जगताप या जर ‘तुतारी’ हाती घेऊन लढल्या तर
या मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार असून दीर आणि भावजय यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळेल.

https://www.instagram.com/p/DAD_cYvJlhx

लक्ष्मण जगताप आमदारपदी असताना त्यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती.
त्यामध्ये अश्विनी जगताप यांना भरघोस मतांनी चिंचवडकरांनी निवडून दिले होते. (Chinchwad Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DAEA2w9CkCu

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil Convoy Car Accident | मद्यपी चालकाची ताफ्यातील गाडीला धडक; मंत्री चंद्रकांत पाटील थोडक्यात बचावले

Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Sangvi Pune Crime News | सांगवीत गाड्या फोडताना पाहिल्याने गतीमंद तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

Mahayuti Seat Sharing Formula | महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला 80 नाही 90 नाही; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

You may have missed