Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार; शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
चिंचवड: Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंबीयांमध्ये (Jagtap Family) उमेदवारीवरून कौटुंबिक कलह निर्माण होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता चिंचवडच्या उमेदवारीवरून एक मोठी अपडेट समोर येत आहे. अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची माहिती आहे.
भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना चिंचवड मधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज (दि.१८) पुण्यामध्ये आमदार अश्विनी जगताप, त्यांचे दीर, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी माझ्याऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवड मधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अश्विनी जगताप यांनी केली. त्यामुळे आता जगताप कुटुंबातील वादही टळणार असून शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Harshvardhan Patil | शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी;
पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील राज्य पातळीवर सक्रिय होणार
Daron Acemoglu News | अभिमानास्पद ! नोबेल पारितोषिक विजेत्याने ‘पुणे न्यूज’ची बातमी
शेअर करुन आपल्याला पारितोषिकाने सन्मानित केल्याची केली घोषणा