Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
चिंचवड: Chinchwad Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल (दि.२९) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे निवडणूक निर्णय कार्यालयात अनेकांची मोठी गर्दी होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi-VBA) जावेद रशीद शेख (Javed Rashid Shaikh) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांकडे (Kalewadi Police) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.२९) दुपारच्या दरम्यान जावेद शेख हे वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यावेळी राहुल कलाटे यांनी जावेद शेख यांना तू कशाला फॉर्म भरतो आहेस?, तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरी मधून फेकून दिली. त्यानंतर शेख यांनी काळेवाडी पोलिसांकडे तक्रार दिली.
याप्रकरणी काळेवाडी पोलिसांकडे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी फॉर्म भरण्याच्या दिवशीच राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा