Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटेंची बंडखोरी तर आता नाना काटे बंडखोरीच्या तयारीत

Nana Kate-Rahul Kalate

पिंपरी : Chinchwad Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) उमेदवार घोषित केल्यानंतर मतदारसंघात राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

महायुतीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने (Ajit Pawar NCP) घ्यावी अशी माजी नगरसेवकांची भूमिका होती. परंतु, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा या महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार चिंचवडची जागा भाजपला सुटली. भाजपने विद्यमान आमदार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी दिली आहे.

त्यानंतर नाना काटे (Nana Kate) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. शरद पवार (Sharad Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची भेट घेतली. मात्र, या पक्षाने राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काटे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केले.

महत्वाची बाब म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत चिंचवड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला होता. एकत्रित राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्यात स्पर्धा झाली होती. त्यावेळी काटे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. तर, कलाटे यांनी बंडखोरी केली होती. आता कलाटे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काटे यांनी बंडखोरी करणार असल्याचे सांगितले आहे.

नाना काटे म्हणाले, ” निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर मी ठाम आहे. नागरिक माझ्यासोबत आहेत. पोटनिवडणुकीत मला एक लाख मते पडली होती. नागरिकांच्या विश्वासावर मी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत राहतील.

अजित पवार यांनी तयारी करण्यास सांगितले होते. परंतू मतदारसंघ भाजपला सुटला.
शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांशी चर्चा केली होती. त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली.
आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून आमची भूमिका स्पष्ट करू “, असे काटे यांनी म्हंटले आहे. (Chinchwad Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण