Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा जागा राष्ट्रवादीला घ्या, अन्यथा तुतारी फुंकू अथवा मशाल पेटवू ! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा अजित पवारांना इशारा?

पुणेरी आवाज – Chinchwad Assembly Election 2024 | भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वाट्याची चिंचवड विधानसभा जागा राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) घ्या. ही जागा नाही मिळाली तर आम्ही येत्या चार-पाच दिवसांत तुतारी (Tutari) फुंकू अथवा मशाल (Mashal) पेटवू असा इशारा राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी अजित पवारांना दिला आहे.
एकीकडे अजित पवार महायुतीत अधिकच्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर, दुसरीकडे त्यांचे खंदे समर्थक जागा मिळवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यामुळे पवारांची महायुतीत (Mahayuti) कोंडी होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
चिंचवडची जागा भाजपाच्या वाट्याला आहे. आता ती जागा राष्ट्रवादीला घेण्याची मागणी पवारांच्या खंदे समर्थकांनी केली आहे. हे सर्व माजी नगरसेवक आहेत. त्यांनी असा दावा देखील केला आहे की, त्यांच्या सोबत 25 माजी नगरसेवक आहेत आणि त्यात भाजपाच्या ही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. पवार समर्थक या नगरसेवकांचे म्हणणे आहे की, जर चिंचवडची जागा राष्ट्रवादीला नाही मिळाली तर पुढील चार-पाच दिवसांत सर्वचजण एक तर तुतारी फुंकणार नाही तर मशाल पेटवणार. परंतू भाजपाचा प्रचार करणार नाही. थोडक्यात या सगळ्यांनी पवारांची साथ सोडण्याचा इशारा दिला आहे.
अजित पवार गटाचा भोसरी-चिंचवडवर दावा
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाने नवा ठराव मंजूर केला आहे. भाजपने बैठक घेऊन पिंपरी विधानसभेवर दावा केला, त्यानंतर आज अजित पवार गटाने ही बैठक घेतली त्यामध्ये भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी-चिंचवड राष्ट्रवादीला घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल तर आम्ही भोसरी आणि चिंचवडमध्ये ही प्रचार न करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असा इशाराच अजित पवार गटाने दिला आहे. या बैठकीत अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे स्वतः उपस्थित होते.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर
पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर लावल्याचं दिसून आलं. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”