Chitra Wagh On Supriya Sule | माझ नावं 100 लोकांसोबत जोडलं, चार-पाच बायकांना प्रेस घ्यायला लावली, सुप्रिया ताई विसरलात का?; चित्रा वाघ यांचा सवाल
मुंबई : Chitra Wagh On Supriya Sule | शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. व्यक्तिगत पातळीवर येऊन एकमेकांवर निशाणा साधत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलेल्या आरोपावरुन हा वाद रंगला असून चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या फोटोवरुन आज विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला.
यावेळी, चित्रा वाघ ह्या आमच्यामुळेच मोठ्या झाल्याचं सांगत, त्यांनी माझ्या सुनेचा वापर करुन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं. यावर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपणाला कशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. १०० लोकांबरोबर आपलं नाव जोडल्याचा गंभीर आरोपही वाघ यांनी केला.
चित्रा वाघ म्हणाल्या, ” विद्या चव्हाण यांना हा विषय राजकीयच करायचा होता. पवारसाहेब व मोठ्या ताई ह्या तुमच्या गँगला आवरा. मला फरक पडत नाही, माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही, हे कृपया नोट करुन घ्या. ज्याच्यामुळे तुमच्यासारखे तोंडावर पडतात असे कच्चे खेळाडू पाठवू नका.
२० वर्षे तुमच्या पक्षात होते, मी बापासारखंच प्रेम केलं, पण तुम्ही काय केलं? तु्म्ही माझा परिवाराला गोत्यात आणायचा प्रयत्न केला, मी सगळं सहन केलं. माझी बदनामी करुन झाली, माझ नावं १०० लोकांसोबत लावून झालं, वाट्टेल ते बोललं गेलं. चार- पाच बायका सुप्रिया ताईंनी प्रेस घ्यायला बसवल्या होत्या, हे विसरलात का काय?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
तुमच्याकडे गौरी चव्हाण (Gauri Chavan) आल्या असत्या तर बाई म्हणून तुम्ही काय केलं असतं? बाई म्हणून मी मदत केली, संवेदना जाग्या झाल्या म्हणून मदत केली आणि हजारदा करेन, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
वाघ पुढे म्हणाल्या, पेनड्राईव्हची वाट आम्ही देशमुखांची बघत होतो. जे पुरावे आहेत ते सादर करा.
अन्यथा तीन तासात आम्ही पेनड्राइव्ह सादर करू.
त्या पोरीला केलं मी गाईड काय करणार आहेत विद्या चव्हाण? हा जर अपराध असेल तर असे अपराध मी करत राहीन.
त्या म्हणतात चित्रा वाघला मी मोठं केलं, पण मला पक्षाने संधी दिली, मी काम केलं.
२० वर्षात पायाची कातडे काढून पक्षाला दिली आहेत. जी जबाबदारी दिली ती पार पाडली.
चित्रा वाघमध्ये काही तरी क्वालिटी होती म्हणून मला जबाबदारी दिली.
आम्ही कधीही लाभाची परवा केली नाही, भाजपने आज कुठलं लाभाचं पद दिलंय,
शेवटचं एक वर्ष मला दिलं, असे म्हणत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर पलटवार केला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश
Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद