CNG Rate Hike In Pune | निकालाअगोदर पुणेकरांना जोर का झटका ! सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ

CNG

पुणे : CNG Rate Hike In Pune | यापूर्वी निवडणुका जाहीर झाल्यावर इंधनाच्या दरात वाढ होत नसे. मतदान झाले, निकाल लागला की गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असे. आता मात्र निकाल लागण्यापूर्वीच सीएनजीच्या दरात तब्बल २ रुपयांनी वाढ केली आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने (Maharashtra Natural Gas Limited) आजपासून प्रति किलो २ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी सीएनजीचा दर प्रति किलो ८५.९० रुपये होता. आता तो ८७.९० रुपये प्रति किलो राहणार आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. आज सकाळी पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालक, कॅब चालकांना दरवाढ झाली असल्याचे समजले.

यापूर्वी ९ जुलै २०२४ रोजी सीएनजीच्या दरात प्रति किलो दीड रुपये वाढ करण्यात आली होती. महानगर गॅस लिमिटेडनेही सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपये वाढ केली आहे. मुंबई व परिसरात सीएनजीचा दर ७७ रुपये प्रति किलो झाला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट

You may have missed