Congress Leader Mohan Joshi | आचारसंहिता भंगाची काँग्रेसकडून तक्रार ! अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : Congress Leader Mohan Joshi | महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज उद्यानात भरवलेल्या किल्ल्यांच्या प्रदर्शनात सरकारी योजनांची माहिती असलेले फलक लावलेले आहेत. हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्याकडे केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. (Congress Leader Mohan Joshi )
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन १० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही किल्ले प्रदर्शनातील फलक अद्याप काढलेले नाहीत. या कामी टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशा मागणीची लेखी तक्रार मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे आणि या तक्रारीची प्रत मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा