Congress Mohan Joshi On PMPML | विद्यार्थी, महिला नोकरदारांना किती वेठीस धरणार ? पीएमपीएमएलसाठी दीड हजार बसेस त्वरीत घ्याव्यात, अन्यथा आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

Congress Mohan Joshi

पुणे – Congress Mohan Joshi On PMPML | शहरातील लाखो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) पीएमपीएमएलने (PMPML Bus) दीड हजार बसेस त्वरीत खरेदी कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पीएमपी प्रशासनाला आज गुरुवारी दिला.

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पीएमपीएमएलच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे (Dipa Mudhol-Munde) यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात चंद्रशेखर कपोते, रमेश अय्यर, बाळासाहेब अमराळे, सुनील मलके, ॲड.शाबीर खान, प्रशांत सुरसे,चेतन अगरवाल, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे पाटील, सुरेश कांबळे,सागर कांबळे,अनिकेत सोनवणे,कृष्णा साठे आदी सहभागी होते.

बसने प्रवास करणाऱ्यांची दररोजची संख्या सरासरी १३ लाख आहे. विद्यार्थी आणि नोकरदार या सेवेवर अधिक अवलंबून आहेत. पण सध्या बसची वाट पहात तासन् तास प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. बसथांब्यांवर शेड नसल्याने प्रवाशांची अधिकच गैरसोय होते. प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. प्रशासनाने आधुनिक पद्धतीने सुसज्ज बसशेड्स उभ्या करायला हव्यात. अशा प्रकारे प्रवाशांना आणखी किती काळ वेठीस धरणार आहात? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

सध्या १६०० बसेस मार्गावर धावत असतात. त्यातच दररोज ५० बसेस ब्रेक डाऊन होऊन बंद पडतात. त्यामुळे बसफेऱ्या ऐनवेळी रद्द होतात. याकरिता बस सेवेत सुधारणा होण्यासाठी दीड हजार बसेस तातडीने खरेदी केल्या जाव्यात. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, बस फेऱ्या रद्द होणार नाहीत. सार्वजनिक बससेवा सक्षम होऊन शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच पीएमपीएमएलचा दरमहाचा जमा खर्चाचा हिशेब पुणेकरांना नियमितपणे दिला जावा.
कारभार अधिक पारदर्शी होण्यासाठी ही मागणी केल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

येत्या ४महिन्यात ७०० बसेस सेवेत दाखल होतील
-दिपा मुधोळ मुंडे

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन येत्या ४ महिन्यात पीएमपीएमएलच्या बस ताफ्यात ७०० बसेस नव्याने दाखल होतील.
त्यात ४०० बसेस पीएमपीएमएलच्या आणि ३०० बसेस ठेकेदारांकडून घेतल्या जातील,
असे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना