Congress Mohan Joshi Pune | लोकमान्यांचे कार्य सद्यस्थितीतही प्रेरणादायी – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : Congress Mohan Joshi Pune | लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा, लोकसंघटन करण्यासाठी गणेशोत्सवाला दिलेली चालना हे कार्य सद्यस्थितीतही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त बोलताना केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि कसबा मतदारसंघ काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला मोहन जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी निता रजपूत, प्रविण करपे, सुरेश कांबळे, चेतन अग्रवाल, गणेश शेडगे, गोरख पळसकर, गणेश तामकर, महेश हराळे, साहिल राऊत तसेच काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमान्य टिळक यांच्या विचारांची प्रेरणा घेत आजच्या युवा पिढीने समाजकारण व राष्ट्रहितासाठी काम करण्याचे आवाहन मोहन जोशी यांनी केले.