Counting of Maharashtra Assembly Votes | पिंपरी विधानसभेची मतमोजणी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे
मतमोजणीची तयारी पूर्ण-निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव
पुणे : Counting of Maharashtra Assembly Votes | पिंपरी विधानसभा मतदारसंघाची (Pimpri Assembly Election 2024) मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील वेटलिफ्टिग हॉल येथे होणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव (Archana Yadhav) यांनी दिली आहे.
या मतमोजणीसाठी एकूण २४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मतमोजणीसाठी वीस आणि टपाली मतपत्रिकेसाठी तीन व इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमसाठी (इटीपीबीएस) एका टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवारांनी टेबलनिहाय मतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक करावी. उमेदवार, नेमणूक करण्यात आलेले मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ओळखपत्र देण्यात येतील. त्यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही श्रीमती यादव म्हणाल्या.
मतमोजणीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत. निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे याची उमेदवार प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजता मतमोजणी प्रक्रियेसाठी नेमणूक केलेले मोजणी पर्यवेक्षक, मोजणी सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक यांना निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले.
मतमोजणीच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असून त्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही तसेच मोबाईल आणण्याची परवानगी नसल्याची सूचना यावेळी देण्यात आली. टपाली मतमोजणी प्रक्रिया, इव्हीएम मतमोजणी प्रक्रिया इत्यादी सर्व विषयांची सखोल माहिती देण्यात आली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.
दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५१.७८ टक्के मतदान झाले असून एकूण २ लाख ०२ हजार ७६६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १ लाख ०५ हजार ३९७ पुरूष तर ९७ हजार ३६० महिला आणि ०९ इतर मतदारांचा समावेश आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा