Creative Foundation Pune | गरजेवर आधारित उपक्रमांचे महत्व जास्त – ना. चंद्रकांतदादा पाटील

Sandeep Khardekar

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना उपयुक्त वस्तू भेट

पुणे : Creative Foundation Pune | एखाद्या संस्थेला, गणपती मंडळाला नेमकं काय हवंय हे ओळखून त्यांच्या गरजेवर आधारित उपक्रमाचे महत्व हे जास्त असतं आणि म्हणून संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कल्पकतेचे मी अभिनंदन करतो असे गौरवोदगार ना. चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी काढले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन च्या वतीने आज 35 संस्था, गणेश मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ व ज्ञाती संस्था तसेच भजनी मंडळाना उपयुक्त असे खुर्च्या, स्पीकर सेट, वॉटर कुलर व इतर साहित्य भेट देण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, योगेश रोकडे, क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर,कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मा. नगरसेवक दीपक पोटे,मा. नगरसेवक विशाल धनवडे,भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, उपाध्यक्ष मंदार बलकवडे,सर्वेश जोशी, संदीप पाटील, योगेश सुपेकर, रशीद शेख, अनुज खरे,विश्वजित देशपांडे, मंदार रेडे,राजनभाई परदेशी,सुनील पारखी, राजू दाभाडे,राजाभाऊ पाटील, दिनेश भिलारे,प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, केतकीताई कुलकर्णी,यासह संतोष लांडे,शंतनू खिलारे,संगीताताई शेवडे, पूनम कारखानीस,मंगलताई शिंदे, कविताताई सदाशिवे,अपर्णाताई लोणारे, रामदास गावडे,कुणाल तोंडे,समीर ताडे,दत्तात्रय देशपांडे इ मान्यवर उपस्थित होते.

कोणताही कार्यक्रम, उपक्रम सुरु केले जाते वर्ष दोन वर्ष ते कार्यक्रम होतात मात्र नंतर आलेले वाईट अनुभव, त्यातून आलेली निराशा किंवा इतर कारणांनी हे बंद पडते, मात्र सातत्याने वर्षानुवर्षे उपक्रम करण्यात क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन चे वेगळेपण आहे त्याचेही मी कौतुक करतो असेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. समाजात काम करताना लोकोपयोगी वस्तू भेट देणे महत्वाचे असून केवळ सरकार वर अवलंबून राहून समाजाची परिस्थिती किंवा सामाजिक स्वास्थ्य सुदृढ होणार नाही तर त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने गरजुंना मदत करावी असे आवाहन देखील ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

क्रिएटिव्ह फाउंडेशन ने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला असून यापुढील काळात रोख स्वरूपात वर्गणी न देता वस्तूरूपी मदत करण्यात येणार असल्याचे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.गणेश मंडळ असतील अथवा अन्य संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, हे जेव्हा मदत मागायला येतात तेव्हा त्यांच्या बोलण्यातून वस्तूंचा अभाव असल्याचे लक्षात आले , यातूनच ही कल्पना सुचली आणि मग स्पीकर, खुर्च्या, वॉटर कुलर, वॉटर प्युरिफायर, पंखे,अन्न धान्य अश्या वस्तू मदत म्हणून देण्याचा मानस केला असेही संदीप खर्डेकर म्हणाले. प्रत्येक महिन्यात क्रिएटिव्ह फाउंडेशन, मुकुलमाधव फाउंडेशन,ग्लोबल ग्रुप, संजीव अरोरा मित्र परिवार,नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट,वेस्टर्न इंडिया फोर्जिंग अश्या सर्वांनीच एकत्र येऊन सेवाकार्याचे मॉडेल तयार केले असून सामाजिक संस्थांना गरजेनुसार मदत करण्याचा निर्धार केला असल्याचे ही संदीप खर्डेकर, संजीव अरोरा, मनोज हिंगोरानी, सचिन कुलकर्णी, अरुण जिंदल यांनी जाहीर केले.
आज प्रामुख्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, अखिल भारतीय ब्राह्मण संघ,हिंदुत्ववादी बहुजन मोर्चा, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना,रोलबॉल असोसिएशन, नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, परशुराम हिंदू सेवा संघ, सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डिसएबीलीटीज, एनॅबलर चॅरिटेबल ट्रस्ट,देशप्रेमी मित्र मंडळ, दशभुजा मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, एकता मित्र मंडळ, सिद्धेश्वर मंडळ,उमेद फाउंडेशन, सेवाव्रत फाउंडेशन इ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले,सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्वागत,योगेश रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले तर प्रतीक खर्डेकर व कल्याणी खर्डेकर यांनी संयोजन केले.

You may have missed