Creative Foundation Pune | “गोपीनाथराव मुंडे साहेब” संवेदनशील, कार्यकर्त्यांची जाण असणारे लोकनेते – संदीप खर्डेकर

Creative Foundation Pune | "Gopinathrao Munde Saheb" A sensitive, people's leader with an understanding of workers - Sandeep Khardekar

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे मुंडे साहेबांच्या 76 व्या जयंती निमित्त लोकोपयोगी साहित्य वाटप

पुणे : Creative Foundation Pune | गोपीनाथराव मुंडे साहेब हे अत्यंत संवेदनशील व कर्यकर्त्यांची जाण असलेले महाराष्ट्राचे लोकनेते होते, त्यांच्या अकाली जाण्याने असंख्य कार्यकर्त्यांचे आणि राज्याचे अतोनात नुकसान झाले असे भाजपा चे प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले.

सामान्य नागरिकांच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा नेता अशी त्यांची ओळख होती, त्यांचा जीवनप्रवास हा संघर्षाने भरलेला होता असेही खर्डेकर म्हणाले.

मा. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या ७६ शहात्तर व्या जयंती निमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संस्थांना लोकोपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त व मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शनी मारुती मंदिराचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दीपक निकम, प्रभाग २९ च्या भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष संगीताताई आधवडे,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर,अलंकार दत्त मंदिराच्या प्रमुख विश्वस्त रजनी जोशीराव,चंद्रकांत भिसे,रंजिता आरेकर,अरविंद परांजपे,दिलीप शिवणेकर,हनुमंत कट्टीमणी,कानिफनाथ मित्र मंडळाचे गोकुळ काळे, प्रमोद काळे, अमित बारमुख, दीपक कदम,भजनी मंडळाच्या शितल म्हसकर,विद्या ननावरे,इंदुमती गोसावी,पुष्पा पाडेकर,सीमा जाधव,अर्चना ननावरे,शर्मिला जगताप,ममता भारती,मालती चिंचवडे,जिमन,सत्यभा मा बांदल, स्वाती साळुंके,मलिक्का पवार, अनिकेत काळे, बाब्या पेंढारे, संगीता साळुंके इ मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते खुर्च्या, सतरंजी, स्पीकर सेट व इतर साहित्य भेट देण्यात आले. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या कार्यविस्तारा साठी झोकून देऊन काम केले, सर्व पातळीवर संघर्ष केला आणि त्यामुळेच आज भाजपा ला सोनेरी दिवस बघायला मिळत आहेत असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

“साहेबांनी” प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला व ते केवळ बहुजनांचे नव्हे तर सर्वच जाती धार्मियांचे नेते होते असे संदीप खर्डेकर म्हणाले.साहेबांच्या निधनाला इतकी वर्ष झाली तरी त्यांच्या आठवणी आणि अस्तित्व पुसलं जात नाहीये असे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते असेही संदीप खर्डेकर म्हणाले. त्यांच्या जयंती दिनी त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आम्ही वाटचाल करत असून जास्तीतजास्त लोकांना मदत करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

You may have missed