Credit Card Fraud | क्रेडिट कार्डचा वापर करताना लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी; अन्यथा लागू शकतो लाखोंचा चूना, उपयोगी पडतील या टिप्स
नवी दिल्ली : Credit Card Fraud | सायबर सिक्युरिटी भारतासह इतर देशांसाठी सुद्धा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे. क्रेडिट कार्ड फ्रॉडसुद्धा याचा एक भाग आहे. क्रेडिट कार्ड स्कॅम एक गंभीर धोका आहे, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार अनधिकृत खरेदी करण्यासाठी तुमची संवेदनशील माहिती जसे की, कार्ड नंबर, पिन, CVV ला टार्गेट करतात. यासाठी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊया…
क्रेडिट कार्डवर ठेवा लक्ष
- नेहमी क्रेडिट कार्ड स्टेटमेंट आणि व्यवहारांच्या स्टेटमेंटवर लक्ष ठेवा. अपरिचित शुल्क अथवा संशयास्पद क्रियाकलापांवर लक्षा ठेवा.
- बँकेला क्रेडिट कार्ड व्यवहारांचे अलर्ट मिळवण्यासाठी साईन अप करा. कोणत्याही अॅक्टिविटीबाबत जागृत रहा.
पासवर्डची घ्या काळजी
- ऑनलाईन बँकिंग आणि शॉपिंग खात्यांना मजबूत, यूनिक पासवर्ड ठेवा.
जन्म तारीख, नाव असे पासवर्ड ठेवू नका.
- टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा. त्यामुळे सुरक्षा मिळेल.
- क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, तसेच संशयास्पद ईमेल, मेसेज अथवा वेबसाईटवरून अटॅचमेंट डाउनलोड करू नका, जे तुमची क्रेडिट कार्ड माहिती मागतात.
विचारपूर्वक वापर करा
- सुरक्षित वेबसाईटवरच खरेदी करा. अॅड्रेस बारमध्ये एचटीटीपीएस आणि पॅडलॉक सिंबॉल पहा.
- ऑनलाईन व्यवहारांसाठी व्हर्चुअल क्रेडिट कार्ड नंबरचा वापर करण्यावर विचार करा. हे टेम्पररी नंबर रियल अकाऊंटशी लिंक करता येत नाहीत, यामुळे जोखीम कमी होते.
- अँटीव्हायरस सॉफ्टवेयर इन्स्टॉल करा आणि ऑपरेटिंग सिस्टम आणि अॅप्स अपडेट ठेवा आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी असुरक्षित सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कचा वापर करणे टाळा.
क्रेडिट कार्डची माहिती सुरक्षित ठेवा
- क्रेडिट कार्ड स्टेटमेंट अथवा रिसिट सारखी संवेदनशील माहिती असलेले कोणतेही कागद फेकण्यापूर्वी ती माहिती नष्ट करा.
कार्ड हरवले, चोरीस गेल्यास अनधिकृत वापर टाळण्यासाठी बँकेला कळवा.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर