Crime News | आई घरच्या कामांमध्ये व्यस्त, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी, माजी मंत्र्यांच्या लेकीनं संपवलं आयुष्य

Suicide Case

गुवाहाटी : Crime News | आसामचे माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांच्या एकुलत्या एक मुलीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवलं आहे. उपासना फुकन असे तिचे नाव असून ती २८ वर्षांची होती. उपासनाने २० मार्चला तिच्या गुवाहाटी येथील खारघुली परिसरातील राहत्या घरात जीवन संपवलं.

अधिक माहितीनुसार, उपासना आपल्या आईसोबत राहत होती. आई घरच्या कामांमध्ये व्यस्त होती, तेव्हा उपासना दुसऱ्या मजल्यावर गेली आणि तिने उडी घेतली. दरम्यान तिला जखमी अवस्थेत तात्काळ गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घरात कुठलीही सुसाइड नोट सापडली नाही.

माजी गृहमंत्री भृगु कुमार फुकन यांचे २००६ मध्ये निधन झाले होते. ते १९८५ मध्ये पहिल्यांदा आसाम गण परिषद सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते आसाम करारावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक होते.

You may have missed