Cross Voting In Vidhan Parishad Election | विधानपरिषदेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 5 काँग्रेस आमदारांवर होणार कारवाई; काँग्रेसमधील फुटीर कोण? जाणून घ्या
मुंबई : Cross Voting In Vidhan Parishad Election | नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले. काँग्रेसच्या आमदारांनी (Congress MLA) महायुतीच्या उमेदवारांना (Mahayuti Candidate) मत दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. दुसरीकडे महायुतीचे नऊही उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले आहे त्यांच्यावर कारवाईच्या हालचाली सुरु आहेत.
काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई करण्याचे निर्देश काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षविरोधी काम करणाऱ्या आमदारांना कडक इशारा दिला आहे. कोणत्या आमदारांवर कारवाई होणार त्यांची नावेही समोर आली आहेत. (Cross Voting In Vidhan Parishad Election)
काँग्रेसकडून पाच आमदारांवर कारवाई होणार असली तरी इतर दोन आमदारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देशही मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत.
दरम्यान कारवाई होणाऱ्या आमदारांमध्ये झिशान सिद्दीकी (Zeeshan Baba Siddique), सुलभा खोडके (Sulbha Sanjay Khodke),
हिरामण खोसकर (Hiraman Khoskar), जितेश अंतापूरकर (Jitesh Raosaheb Antapurkar),
मोहन हंबिर्डे (Mohanrao Hambarde) यांचं नाव असल्याची माहिती मिळते आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…