Cyclists’ accident during Pune Grand Tour | डेक्कनमध्ये पुणे ग्रॅण्ड टूरदरम्यान सायकलपटूंचा अपघात; वादाचा व्हिडिओ SM वर व्हायरल

Cyclists’ accident during Pune Grand Tour | Cyclists’ accident during Pune Grand Tour in Deccan; clash video goes viral

पुणे: Cyclists’ accident during Pune Grand Tour | पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेदरम्यान शुक्रवारी दुपारी डेक्कन परिसरात अपघाताची घटना घडली. संभाजी महाराज पुतळ्याजवळील मार्गावर हा अपघात झाला असून, त्यानंतर काही सायकलपटूंमध्ये वादावादी आणि शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/DT44FH3iU2p

अपघातानंतर परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. मात्र, घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर स्पर्धा पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. व्हायरल व्हिडिओवर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, पुण्यातील ऐतिहासिक मार्गांवरून झालेल्या ९५ किलोमीटर अंतराच्या अखेरच्या ‘पुणे प्राइड लूप’ टप्प्यात आंतरराष्ट्रीय सायकलपटूंनी दमदार कामगिरी केली. अंतिम टप्प्यात ली निंग स्टार संघाच्या श्नायर्को ॲलिक्सेई यांनी १ तास ५६ मिनिटे ५४ सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला.

दोन टप्प्यांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ल्यूक मडग्वे यांनी संपूर्ण पुणे ग्रॅण्ड टूरचे विजेतेपद पटकावले, तर ली निंग स्टार संघाने सांघिक विजेतेपद मिळवले. अपघाताची घटना घडूनही स्पर्धेचा उत्साह आणि रंगत कायम राहिल्याचे चित्र दिसून आले.

You may have missed