Dadawala Junior College | दादावाला ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन अभिजया लोकनृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

Dadawala Junior College

पुणे : Dadawala Junior College | दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ए. एस. डी. बी. दादावाला जुनिअर कॉलेजच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजया आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२४ रोजी या स्पर्धेचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेद्वारे विविध शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकनृत्य कला सादर करण्याची संधी मिळाली.

स्पर्धेचे उद्घाटन तथा पारितोषिक वितरण दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश शाह, उपाध्यक्ष जनक शाह, सचिव हेमंत मणियार, सहसचिव प्रमोद शाह, संदीप शाह, दिलीप भाई जगड, विनोद देडिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्या सोनल बारोट, उपप्राचार्य विश्वनाथ पाटोळे उपस्थित होते, तसेच या स्पर्धेला केतकी वाडेकर, श्वेता वेदांतम, अपर्णा धुपकर, भावना सामंत हे परीक्षक म्हणून लाभले. या स्पर्धेसाठी जवळपास ३० शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

लोककला ही आदीमानवनिर्मित असून ही लोककला महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे या संपत्तीचे जतन करून नव्या पिढीने हा सांस्कृतिक ठेवा जतन करावा असे आवाहन दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश भाई शाह यांनी केले.

आंतरशालेय इयत्ता ८वी ते १०वीमधील गटात अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल प्रशालेला प्रथम पारितोषिक, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल प्रशालेला द्वितीय पारितोषिक, हुजूरपागा गर्ल्स हायस्कूल लक्ष्मी रोड प्रशालेला तृतीय पारितोषिक, तसेच आरसीएम गुजराती हायस्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

आंतर महाविद्यालयीन इयत्ता ११वी ते १२वीमधील गटात प्रथम पारितोषिक ए. एस. डी. बी. दादावाला कनिष्ठ महाविद्यालयाने, द्वितीय परितोषिक हुजूरपागा कात्रज महाविद्यालयाने, तृतीय पारितोषिक आर डी कनिष्ठ महाविद्यालयाने पटकावले, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक एनसीएल कनिष्ठ महाविद्यालयाने पटकावले.

प्रथम पारितोषिक विजेत्याला रोख रक्कम रुपये १०,०००/- व चषक,
द्वितीय परितोषिक विजेत्याला रोख रक्कम रुपये ७०००/- व चषक, तृतीय पारितोषिक विजेत्याला रोख रक्कम रुपये ५०००/- व चषक,
तसेच उत्तेजनार्थ विजेत्याला रोख रक्कम रुपये २,०००/- व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेचे आयोजन पर्यवेक्षिका माधुरी पाटील, अर्चना बारोट, सविता कुलकर्णी यांनी केले.
प्रास्ताविक पर्यवेक्षिका शमा गद्रे यांनी केले. अर्चना काळे, उषा चव्हाण, अनुजा सेलोट,
शिल्पा मुदगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed