Dahanukar Colony Pune Crime News | अश्लिल कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 लाखांची मागितली खंडणी

पुणे : Dahanukar Colony Pune Crime News | वडिलांच्या अश्लिल कृत्याचा व्हिडिओ पाठवून तो नातेवाईकांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत डहाणुकर कॉलनी (Dahanukar Colony) राहणार्या एका ४१ वर्षाच्या नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरज राजेंद्र पवार (Suraj Rajendra Pawar (वय ३२, रा. जैनापूर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ ते २१ नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी घरी होते. त्यावेळी त्यांचे व्हॉटसअॅपवर फिर्यादी यांचे वडिलांसोबत केलेल्या अश्लिल कृत्याचा आरोपीने व्हिडिओ पाठविला. हा व्हिडिओ फिर्यादीच्या नातेवाईक यांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तो व्हायरल करु नये, यासाठी ५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली.
फिर्यादी यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. आरोपीने सातत्याने धमकी देणे सुरुच ठेवल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट