Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक

rape

पुणे : Dandekar Pool Pune Crime News | माझ्यासोबत लग्न करणार का अशी विचारणा करुन एका अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे (Molestation Case). हा प्रकार गुरुवारी (दि.18) सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुल परिसरात घडला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी (Parvati Police Station) एका 40 वर्षीय नराधमावर पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Dandekar Pool Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वसिम सलिम पटेल Wasim Salim Patel
(वय-40 रा. दांडेकर पुल, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 78(1)(एक), पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची 12 वर्षाची मुलग गुरुवारी रात्री दूध आणण्यासाठी गेली होती.

त्यावेळी आरोपी वसिम पटेल याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला तु माझ्या मुलासोबत लग्न करशील का अशी विचारणा केली. तसेच तिला अश्लील स्पर्श केला. मुलगी दुध घेऊन घरी येत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. बिल्डींगच्या पार्कींगमध्ये तिला अडवून तु माझ्या मुलासोबत नाही तर माझ्या सोबत लग्न करशील का अशी विचारणा करून तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed