Dandekar Pool Pune Crime News | पुणे: प्रेमसंबंधातून तरुणाचा खुन, दांडेकर पुलावरील घटना

Murder-In-One-Sided-Love

पुणे: Dandekar Pool Pune Crime News | प्रेमसंबंधांना विरोध करुन टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारुन त्याचा खून केला. ही घटना दांडेकर पुल येथील सार्वजनिक शौचालयाच्या तिसर्‍या माळ्यावर सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजता घडली. (Dandekar Pool Murder)

https://www.instagram.com/p/DBLJfP2Cato

कौस्तुभ जयदिप नाईक (वय २९, रा. सदाशिव पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी (Parvati Police) तिघांना अटक केली आहे. दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पंकज नांगरे (वय ३१, रा. वीटभट्टी, दांडेकर पुल) यांनी पर्वती पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. (Dandekar Pool Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DBLGPPCCCIP

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ नाईक याचे आरोपीपैकी एकाच्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध होते. या कारणावरुन आरोपी कौस्तुभवर रागावून होते. कौस्तुभ दांडेकर पुलावर आला असताना सहा जणांनी त्याला गाठले. त्याला मारहाण करु लागले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना मारामार्‍या करु नका, असे सांगितले.

तेव्हा आरोपी यांनी फिर्यादीना तू आमच्यामध्ये पडु नको,
असे म्हणून कौस्तुभ याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करुन त्याचा खून केला.
पोलिसांनी तिघांना अटक केली असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक अमोल मोरे (PI Anil More) तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DBJlNLYCZwm

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Police Inspector Suspended In Pune | पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सहायक उप निरीक्षक तडकाफडकी निलंबित, जणून घ्या प्रकरण

Sharad Pawar On Ajit Pawar | ‘लाडकी बहीण’ वरून शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला; म्हणाले – ‘बारामतीतही एक बहीण निवडणुकीला उभी होती, तेव्हा…’

Ajit Pawar NCP Leader To Mahayuti | अजित पवारांच्या नेत्याचा महायुतीला इशारा; म्हणाले – ‘मला उमेदवारी दिली नाही तर…’

You may have missed