Dattatray Alias Aba Kale | पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती

Aba Kale

पुणे : Dattatray Alias Aba Kale | गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात तसेच पैलवान म्हणून दत्तात्रय उर्फ आबा पांडुरंग काळे हे प्रसिध्द आहेत. त्यांच्या या कार्याचा लाभ महाराष्ट्रातील पैलवानांना व्हावा याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या ‘प्रदेश उपाध्यक्ष (निमंत्रित)’ या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील पैलवानांना न्याय देण्याकरिता तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे संघटन वाढवण्याकरिता प्रयत्न करावे, असे या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान या नियुक्तीवर बोलताना दत्तात्रय उर्फ आबा काळे म्हणाले, राज्यात कुस्तीचा नावलौकिक वाढवण्याबरोबरच या क्षेत्रामध्ये अनेक मल्ल तयार करणे, तसेच पैलवानांना न्याय मिळेल या भूमिकेतून प्रयत्न करणार असल्याचे दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी म्हंटले आहे. त्याचबरोबर ही निवड सार्थ ठरवण्यासाठी आगामी काळात उल्लेखनीय जबाबदारी पार पाडू,असेही त्यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed