Dattatray Bharane On Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दत्तात्रय भरणेंची खोचक टीका; म्हणाले – ‘तुमचा आमदार झोपलेला नाही…’

इंदापूर: Dattatray Bharane On Harshvardhan Patil | माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाईवरुन सूचक वक्तव्य केले होते. भाजपमध्ये आल्याने मस्त आणि निवांत आहे, शांत झोप लागते, सध्या आपली चौकशी नाही की ईडीची भीती नाही, असे विधान त्यांनी केले होते. यावरूनच आता इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे. (Indapur Assembly Constituency)
दत्तात्रय भरणे म्हणाले, ” इंदापूरकरांनो तुमचा आमदार कमी बोलतो, कमी जाहिरात करतो, फ्लेक्स कमी लावतो, व्हाट्सअप वर कमी येतो, मीडियामध्ये चॅनलवर कमी दिसतो, मात्र तुमचा आमदार झोपलेला नाही”, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हंटले आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख हर्षवर्धन पाटील यांच्यावर होता. त्यांचं नाव न घेता भरणे यांनी ही टीका केली आहे. (Dattatray Bharane On Harshvardhan Patil)
काही दिवसांपूर्वीही त्यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामे केल्यामुळे शांत झोप लागते, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना डीवचलं होतं. या केलेल्या टीकेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंदापूर विधानसभेसाठी दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील दोघेही महायुतीतून इच्छुक आहेत.
मात्र ही जागा महायुतीत अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी (Tutari) फुंकण्याच्या तयारीत आहेत.
अद्याप पाटलांनी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश केलेला नाही.
त्यामुळे विधानसभेला हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maj Gen Anurag Vij At Bhau Rangari Ganpati | मेजर जनरल अनुराग वीज यांनी घेतलं
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)