Daund Assembly Constituency | दौंड विधानसभेवरून राष्ट्रवादी-भाजपात धुसफूस; राष्ट्रवादीने केला दावा; राहुल कुल यांची डोकेदुखी वाढली
दौंड : Daund Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. दरम्यान इच्छुक उमेदवार मतदारसंघात सभा, बैठका घेताना दिसत आहे. जागावाटप ज्या पक्षाकडे जाईल तिकडे उडी मारण्याच्या तयारीत काहीजण आहेत. (MH Election 2024)
महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) तीन-तीन पक्ष असल्याने जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला आहे. एकाला तिकीट दिले तर इतर दोन पक्षातील इच्छुक बंडखोरीच्या तयारीत असणार आहेत.
अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (Ajit Pawar NCP) दौंड विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. या मागणीमुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून वीरधवल जगदाळे (Veerdhaval Jagdale) यांची ओळख आहे.
वीरधवल जगदाळे हे दौंड साखर कारखान्याचे (Daund Sugar Factory) संचालक असून त्यांनी दौंड विधानसभा मतदार संघावर दावा केला आहे. भाजपचे नेते राहुल कुल (Rahul Kul) यांचा हा मतदारसंघ आहे . परंतु अशातच आता जगदाळे यांनी केलेल्या मागणीमुळे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
बारामती लोकसभेला (Baramati Lok Sabha) सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar)
यांनी निवडणूक लढवावी अशी पहिली मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती.
ती मागणी मान्य देखील झाली होती. दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे गेल्यास आमदार राहुल कुल
यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद