Daund Assembly Constituency | इरादा पक्का! अजित पवारांचा माजी आमदार ‘घड्याळ’ सोडून ‘तुतारी’ हाती घेणार

दौंड : Daund Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. जागावाटपाबाबत पक्षामध्ये बैठका, चर्चा सुरु आहेत. इच्छुक उमेदवार ज्याठिकाणी उमेदवारी मिळेल, सोयीस्कर निवडून येऊ अशा पक्षात पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. (Shrad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP)
एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्याने बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंडखोरी रोखणे महाविकास आघाडी आणि महायुती समोरील आव्हान असणार आहे.
पक्षांनी मोर्चेबांधणी करीत निवडणुकीची तयारी सुरु केली असताना माजी आमदार रमेश आप्पा थोरात लवकरच ‘घड्याळ’ सोडून ‘तुतारी’ हाती घेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खुद्द रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनीच यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दौंडमध्ये मोठा धक्का बसणार आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघ हा भाजपला सुटण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे रमेश थोरात यांची राजकीय अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे रमेश थोरात यांनी गावोगावी जाऊन दौरे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांची मते घेऊन ते आपली भूमिका ठरवणार आहेत. त्यामुळे दौंडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
थोरात हे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले.
मात्र राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले.
मात्र आता राजकीय समीकरणे बदलू लागली असून शरद पवारांसोबत सहानुभूतीची लाट पाहायला मिळत आहे.
त्यातच लोकसभेला शरद पवार यांना मिळालेले यश ही जमेची बाजू आहे.
विधानसभेला मात्र दौंडची जागा भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत.
त्यामुळे आपण येथे आठवड्याभरामध्ये आपली पुढील भूमिका जाहीर करणार
असल्याचे रमेश थोरात यांनी सांगितले. (Daund Assembly Constituency)
वेगळा व्हिडिओ –
https://www.instagram.com/p/DAAh9N3JfGf
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा