Daund Assembly Election 2024 | दौंड मतदारसंघात नाट्यमय घडामोडी, अखेर राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात असा सामना रंगणार
दौंड: Daund Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची आज मुदत होती. दरम्यान राज्यभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे समोर आले. दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार वीरधवल उर्फ बाबा जगदाळे यांनी आज (दि.४) आपला उमेदवार अर्ज मागे घेतला. (Daund Assembly Election 2024)
त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते बादशाह शेख, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडून लढण्यास इच्छुक असलेले राजाभाऊ तांबे यांनीही अर्ज मागे घेतल्याने दौंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल (Rahul Kul) विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रमेश थोरात (Ramesh Thorat) असा पारंपरिक सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या राजाभाऊ तांबे आणि बादशाह शेख
यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेत रमेश थोरात यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
त्यामुळे थोरात यांची राजकीय ताकद वाढली आहे.
मात्र या लढतीत २३ नोव्हेंबरला कुल की थोरात गुलाल उधळणार ? याची उत्सुकता सर्वांना आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा