Daund Assembly Election 2024 | दौंड मतदारसंघ मिळवण्यासाठी अजित पवार गटातील नेते आग्रही; म्हणाले – ‘4 तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण…’
पुणे: Daund Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीत अद्यापही जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing Formula) रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. दौंड आणि पुरंदरमध्ये (Purandar Assembly Constituency) अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) अधिकृत उमेदवाराविरोधात थेट एबी फॉर्म देऊन उमेदवार दिलेले आहेत.
दौंड विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे. अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात दौंड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे (Vaishali Nagawade) यांनी केली आहे.
वैशाली नागवडे म्हणाल्या, ” उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ४ तारखेच्या वाटाघाटीमध्ये जे होईल ते होईल पण आम्ही ही जागा मिळावी यावरती ठाम आहोत. भाजपचे नेते सातत्याने महायुती धर्म निभवावा असं सांगतात. पण दौंड तालुक्याचा विकास अजित दादांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीचीच आहे”, असे नागवडे यांनी म्हंटले आहे.
दौंड विधानसभेसाठी राहुल कुल यांनी भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू सहकारी वीरधवल जगदाळे यांना एबी फॉर्म देत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या घडामोडीवर राहुल कुल (Rahul Kul) म्हणाले, “लोकसभेला आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे. विधानसभेला देखील त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा आहे. आमच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा धर्म पाळावा हे अपेक्षित आहे. वरिष्ठ स्तरावर हा निर्णय होईल असे अपेक्षित आहे”, असे कुल यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा