Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

Daund Leopard Attack

पुणे / दौंड : Daund Leopard Attack | कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लताबाई बबन धावडे (वय-५०) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान लताबाई धावडे आपल्या उसाच्या शेतात काम करीत होत्या. याच दरम्यान बिबट्याने लताबाई यांच्यावर झडप घालत त्यांना तो ऊसामध्ये घेवून गेला. मात्र कुठलीही हालचाल करण्यास न मिळाल्याने काही क्षणातच धावडे यांचा मृत्यू झाला. लताबाई यांच्या मागे पती, विवाहित मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान या घटनेने कडेठाण गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली अनेक दिवसांपासून बिबट्याचा ऊसाच्या परिसरात वावर वाढला गेला असून यामुळे नागरिक त्रस्त व भययीत झाले आहेत.

वरवंड, कानगाव, केडगाव, पाटस, नानगाव या ऊसाच्या पट्ट्यातील गावामध्ये बिबट्याचा वावर वाढला असून या भागातील शेतकरी शेतात कामाला जाण्यास देखील नकार देऊ लागला आहे.
महिलेच्या मृत्यूमुळे नागरिकांनी वन विभागाकडे बोट दाखवत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान या घटनेचा तपास यवत पोलीस ठाणे, वन विभाग करीत आहे.

“बिबट्याच्या हल्ल्यात लताबाई धावडे या शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
बिबट्यांचा प्रजननावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन पातळीवर धोरण आणणे किती गरजेचे आहे
हे या दुर्देवी घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले गेले आहे”, असे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी म्हंटले आहे. (Daund Leopard Attack)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sangli Crime News | शेततळ्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू ; तळ्याजवळ खेळत असताना घडली दुर्घटना

Pune Swargate Crime News | भरदिवसात गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य;
मैत्रिणींनी खडसावले, स्वारगेटजवळील प्रकार

You may have missed